Saturday, March 19, 2011

ओढणीचा तो तुकडा

ओढणीचा तो तुकडा अजूनही तसाच आहे ,
ठिपका तो रक्ताचा अजूनही तसाच आहे.
दिवस बरेच लोटले, तरी गंध तोच आहे.
जखमा भरून आल्या खपल्याही निघून गेल्या,
परी,भाळी स्पर्श तुझा तो अजूनही तसाच आहे !!

नव्हती ओळख आपली,नव्हते ठाऊक काही
कुण्या गावाची तू अन् कुण्या गावाचा मी !
काळीज एकच घरटे ! दोघांच्याही कडचे,
एकाचवेळी दोघांनी दोन्हीकडे राहण्याचे!

दोघांचाही पहिला पाऊस एकच आहे
हिरव्या रानावारती तो एकटाच बरसत आहे !!
मोकळ्या केसांत तुझ्या श्वास गुरफटत आहे,
भिजलेल्या तुला पाहता जवळ मी घेतो आहे ,
ओल्या ओठांमागे भीती दडली आहे !

कवेत घेता तुला जाग ही येते आहे,
स्वप्नात माझ्या सारे,
हातात फक्त ओढणी आहे !!!

No comments:

Post a Comment