Friday, March 18, 2011

५० वर्षानंतर आज महाराष्ट्र ची अवस्था खालील कविते प्रमाणे आहे

तेजाचे तारे तुटले मग मळेची सगळे पिकले !
लागती दुहीच्या आगी राष्ट्राच्या संसाराला ;
अति महामूर पूर येते ढोग्याच्या पावित्र्याला ;
खडबडात उडवी जेव्हा कोरडया विधीचा मेळा;
चरकात मान्यवर पिळती
सामान्य मुकी जनता ती ,
लटक्याला मोले येती ,
कौटिल्य स्वैर बोकाळे ! तेजाचे तारे तुटले !!

अचारविचारौघाचा नवनित्य रक्तसंचार
ज्या समाजदेही होता अनिरुद्ध करीत व्यापार
त्या देहा ठायी ठायी घट कसले बंध अपार
कोंडिले स्वार्थकोंड्यात,
जल सडले ते निभ्रांत
तरी धूर्त त्यांस तीर्थत्व
देऊनी नाडती भोले ! तेजाचे तारे तुटले !!

कर्तव्य आणि श्रेयाची हो दिशाभूल जेव्हां ती,
आंधळा त्याग उपजोनी डोहळे भिकेचे पडती;
अतिरेक पूज्यभावाचे फुंकिती विवेकेज्योती;
मग जुन्या अप्तावाक्याते
भलतिशीच महती येते,
राणीची दासी होते,
बुद्धीचे फुटती डोळे ! तेजाचे तारे तुटले !!

घन तिमिरी घोर अघोरी विक्राळ मसण जागवती;
ती ' परंपरा ' आर्यांची 'संस्कृती' 'शिष्टरूढी' ती;
'धर्मादी' प्रेत झाल्याची बेफाम भुते नाचवती;
सत्तेचे फक्त पुजारी उरले तेजाचे तारे तुटले !!

No comments:

Post a Comment